‘भुयपर्मळ’ : हे स्वतंत्र चेहरा जन्माला घेऊन आलेलं लेखन आहे... हा संग्रह कोकणी माणसाच्या जगण्याचा लेखाजोखा आहे...
कोकणातल्या काही रूढी, परंपरा, संस्कृती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशा काळात अशा गोष्टींचं लेखन खूप आवश्यक आहे. पुढील पिढ्यांसाठी हा इतिहासकालीन ठेवा असेल. माणसाच्या जगण्यातील गुंतागुंतीचा शोध घेणारं हे लेखन आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एखाद्या अनुभवाकडे खूप तिरकसपणे पाहण्याची लेखिकेची वृत्ती वाचकाला वाचनासाठी प्रवृत्त करते. मराठीतील ललितलेखनाच्या समृद्ध परंपरेत हा संग्रह चांगली भर घालेल.......